बिसलपूर : उसाच्या तोडणी पावत्या न मिळाल्याने संतप्त झालेल्या करनैय्या गावातील एका शेतकऱ्याने ऊस समिती कार्यालयात सचिवांसमोर मोठा गोंधळ घातला. सोमवारी सहकारी ऊस विकास समितीच्या सचिवांकडे करनैय्यातील एक शेतकरी आला. त्याने सांगितले की, खोडवा प्रकारचा ऊस त्याच्याकडे असून अद्याप तोडणी पावती मिळालेली नाही. ऊस विभागाच्या दुर्लक्षाने असा प्रकार घडल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला. नियमानुसार नोव्हेंबरमध्ये ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर लागण उसाच्या तोडणी पावती सोबत खोडवा उसालाही तोड दिली जाते. मात्र, पावती न दिल्याने आपला ऊस शेतातच वाळू लागला आहे, असे या शेतकऱ्याने सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सचिवाने या शेतकऱ्याला ऊस तोडणी पावती लखनौतील ऊस आयुक्त कार्यालयातून जारी केली जाते, असे सांगितले. पावती जारी करणे हे सचिवांच्या हाती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्याचे समाधान झाले नाही. सचिव जबाबदारी टाळत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला. त्यानंतर या शेतकऱ्याने मोठा गोंधळ घातला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. सचिवांनी एका विभागातील अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधून या शेतकऱ्याच्या शंकेचे समाधान केले.