पिलिभीत : जिल्ह्याचा ऊस गळीत हंगाम ३० एप्रिल रोजी संपणार

बिसलपूर  :  किसान सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने आणि ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम संपुष्टात येईल असे सांगण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांनी सांगितले की, ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कारखान्यांना कधीपर्यंत गाळप केले जाईल असे विचारले आहे. किसान सहकारी साखर कारखाना बिलसपूरचे मुख्य ऊस अधिकारी अवधेश कुमार यांनी सांगितले की, त्यांचा कारखाना २० मार्चपर्यंत चालेल. किसान सहकारी साखर कारखाना, पुनरपूरचे मुख्य ऊस अधिकारी अमित कुमार यांनी २० मार्चपर्यंत कारखाना सुरू राहील असे सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बजाज हिंदूस्थान साखर कारखाना बरखेडाचे अधिकारी अनिल कुमार यांनी १५ मार्चपर्यंत कारखाना सुरू राहिल असे सांगितले. द्वारिकेश साखर कारखाना फरिदपूरचे ऊस अधिकारी उपेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांचा कारखाना ३१ मार्चपर्यंत चालू राहाणार आहे. दालमिया शुगर मिल निगोहीच्या ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० एप्रिल रोजी गळीत हंगाम संपुष्टात येईल. तर ललित हरी साखर कारखाना पिलिभीतचे ऊस अधिकारी के. पी. शर्मा यांनी त्यांचा गळीत हंगाम अद्याप ३० एप्रिलपर्यंत चालू राहील अशी माहिती दिली. यावेळी सर्व कारखान्यांचे आणि ऊस विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here