बिजनोरमध्ये नवा साखर कारखाना स्थापन करण्याचा प्रस्ताव

बिजनोर : उत्तर प्रदेशातील साखरेचे कोठार म्हणवल्या जाणाऱ्या बिजनौर जिल्ह्यातील चांगीपूर गावात या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत साखर कारखान्याची उभारणी केली जाईल. जिल्हा ऊस अधिकारी प्रभू नारायण सिंह यांनी सांगितले की, कारखान्याची उभारणी बिंदल समुहाद्वारे ६३० कोटी रुपये खर्चून केली जाईल. सुमारे ३०० एकर जमिनीवर हा कारखाना असेल. कारखान्याचे महाव्यवस्थापक जितेंद्र कुमार मलिक यांनी सांगितले की, आम्ही नूरपूर विभागातील चंगीपूर गावात एक साखर कारखाना आणि डिस्टीलरी स्थापन करीत आहोत. कारखाना प्रतीदिन किमान एक लाख क्विंटल उसाचे गाळप करील. इथेनॉल उत्पादन १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

नवा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. या कारखान्यामुळे हंगामात इतर कारखान्यांवरील गाळपाचा भार विभागला जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी वेळेवर तोडणी करू शकतात. सध्या जिल्ह्यात नऊ साखर कारखाने आहेक, यापैकी एक खासगी तर एक सहकारी साखर कारखाना आहे. नोव्हेंबर ते मे या कालावधीत सुरू होणाऱ्या गळीत हंगामात हे कारखाने दररोज ६.५ लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळप करतात. लखिमपूरनंतर ऊस शेतीमध्ये बिजनोर राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. येथे २.५ लाख हेक्टरमध्ये ऊस शेती केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here