दौंड कारखान्याचे प्रती दिन सतरा हजार टन गाळपाचे नियोजन

पुणे : दौंड तालुक्यातील आलेगाव येथीलदौंड साखर कारखान्याने आगामी २०२३ – २०२४ गाळप हंगामात प्रती दिन सतरा हजार टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी कारखान्याचे अधिकारी दीपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके उपस्थित होते. कारखान्याने १५ जूनपासून ८६०३२, ०२६५, १५०१२ या उसाच्या आडसाली लागवडीना परवानगी दिली आहे. मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला जिल्ह्यात उच्चांकी १२.२१ इतका उतारा मिळाल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले. कारखान्यातर्फे देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे १२ जून रोजी ‘बदलते हवामान व शेती’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here