नूर सुल्तान : गेल्या वर्षी देशांतर्गत साखर उत्पादनातून स्थानिक पातळीवर साखरेची ४२ टक्के गरज भागवण्यात आली होती. तर ५८ टक्के साखर आयात करण्यात आली होती अशी माहिती कृषी मंत्री येरबोल करशुकेयेव यांनी दिली. मंत्री करशुकेयव यांनी सांगितले की, बीट लागवडीचे क्षेत्र, उत्पादन क्षमता आणि कच्च्या मालातील वाढीमुळे आगामी ३-४ वर्षांत साखर उत्पादन ८० टक्के वाढवून आत्मनिर्भरता मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
मंत्री म्हणाले की, देशात सध्या चार प्रमुख साखर कारखाने आहेत. ते मुख्यतः जाम्बिल आणि अल्माटी विभागात आहेत. कारखान्यांमध्ये सर्वाधिक साखर उत्पादन बीटपासून केले जाते. बीटचे लागवड क्षेत्र वाढविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सरकारने सध्याच्या कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देशाच्या दक्षिणेकडील भागात आणखी एका साखर कारखान्याची उभारणी करण्याचे उद्दीष्टही निश्चित करण्यात आले आहे.