सोलापूर : वेणुनगर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी कारखाना कार्यस्थळावर व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते प्रशासकीय कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कारखाना परिसरामध्ये व कामगार वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कारखाना परिसरासह कामगार वसाहतीमध्ये पर्यावरण जागृतीपर डिजिटल बोर्ड लावण्यात आले.
प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी सांगितले की, जागतिक पर्यावरण दिन व कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी नियोजित असलेला ४१ वा वाढदिवस या कालावधीत कारखाना परिसरात १०,००० रोपे लावण्याचा संचालक मंडळाने संकल्प केला आहे. त्याला सर्वांनी पाठबळ द्यावे. संचालक कालिदास पाटील, संभाजी भोसले, दत्तात्रय नरसाळे, कालिदास साळुंखे, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, तज्ज्ञ संचालक अशोक तोंडले व दशरथ जाधव, निमंत्रित संचालक अंगद चिखलकर, वर्क्स मॅनेजर यु. के. तावरे, चीफ केमिस्ट बी. आर. माने, डिस्टिलरी मॅनेजर एन. एस. सोळंके, केन मॅनेजर एस. एस. बंडगर, सेल्स ऑफिसर महेश घाडगे, ऊस विकास अधिकारी उद्धव बागल, केनयार्ड इन्चार्ज जयंत सलगर, पर्यावरण केमिस्ट एस. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.