सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यकारी संचालक महावीर घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान, कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर सभासद मोफत साखर केंद्रावरून, शेतकरी सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत साखर वाटपाचा प्रारंभ कारखान्याचे रेठरे हरणाक्ष येथील सभासद महादेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गुलमोहर, कदंब, बकुळ, ताम्हण, कांचन तसेच इतर देशी जातीची वृक्षलागवड करण्यात आली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी हरित पट्टा निर्माण करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, टेक्नितल जनरल मॅनेजर बालाजी पबसेटवार, टेक्निकल को-ऑर्डिनेटर एस. डी. कुलकर्णी, विकास आभाळे, दादासाहेब शेळके, राजाराम चन्ने, विक्रमसिंह माने, शशिकांत पाटील, एस. एच. शेख, संदीप भोसले, पंकज पाटील, सुयोग खानविलकर, जयराज पाटील, नारायण चव्हाण, डॉ. हर्षल निकम आदी उपस्थित होते.