एफ आर पी अधिक दोनशे रुपये दर द्यावा

ऊस परिषदेत मागणी:
कोल्हापूर, ता. 24 : या वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांना एफ आर पी अधिक दोनशे रुपये पहिला हप्ता द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. वारणा कोडोली येथे झालेल्या ऊस परिषदेत मध्ये ही मागणी करण्यात आली. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार दर्शवला.

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ज्या ठिकाणी दुष्काळ जाहीर होईल त्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामे नव्याने सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत. जनावारांना चारा आणि पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध करून देण्यात यावे. कर्ज वसूली, वीज बिल वसुली तसेच शासकीय कर आकारणी करणे थांबविण्यात यावे. विद्यार्थ्यांची शैक्षणीक फी माफ करण्यात यावी.
दुष्काळ जाहीर होणाऱ्या भागातील जनतेला अल्प दरात धान्य देण्यात यावे. शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर शेत-पाणंद रस्ते अभियान राबविण्यात यावे. मराठा, लिंगायत आणि मुस्लीम समाजास आरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी लागू करण्यात याव्यात.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान येाजनेमध्ये शेतकरी उस कालावधीनुसार कर्ज उचल करत असल्यामुळे १ मार्च २०१४ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत बदल केल्यास उचल केलेल्या व मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होईल असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. शेतकरी, उसतोडणी कामगार, मजूर यांना रोजगार हमी योजनेच्या कक्षात सामावून घ्यावे.
शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकरकमी मिळावी. सध्याच्या साखरेच्या २९०० रूपयांच्या भावात वाढ करून ती ३२०० रूपये करण्याची शिफारस केंद्राकडे करावी.
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रूपये दर देण्यात यावा.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here