पीएम किसान सन्मान निधी : योजनेच्या बेनिफीशरी स्टेटस तपासणीसाठी आधार क्रमांक वापरता येणार नाही

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोदी सरकारच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा हेतू शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा आहे. यासोबत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल असे प्रयत्न आहेत. यासाठीच पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेत सरकारने एक मोठा बदल केला आहे. तुम्ही आधार क्रमांकावरून आपले बेनिफिशरी स्टेटस पाहू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करावा लागेल.

मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्यावृत्तानुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १२ वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला. देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ११ व्या हप्त्यामध्ये २१,००० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यावेळी १० कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळाला. आता ८ हजार कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे. जर किसान सन्मान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर घरबसल्या तुम्ही स्टेटस चेक करू सकता. यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

मात्र, स्टेटस चेक करण्याच्या नियमात सरकारने बदल केला आहे. आधी बेनिफीशरी स्टेटस पाहण्यासाठी आधार अथवा मोबाईल क्रमांक वापरला जात होता. मात्र, आता तसे होणार नाही. आधार कार्डचा वापर थांबविण्यात आला आहे. तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. या बेनिफीशरी स्टेटसमध्ये तुमच्या अकाउंटची सर्व माहिती समाविष्ट असते. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी १५५२६१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तेथे योजनेची सर्व माहिती मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here