पीएम किसान योजना: या कारणांमुळे रखडला असेल तुमचा योजनेचा १२ वा हप्ता

ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधीचा १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. १६ कोटींहून अधिक रक्कम देशातील ८ कोटी हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पाठविण्यात आली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत, की ज्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचलेली नाही. खरेतर चुकीचा आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर अथवा ई-केवायसी न केल्याने हे शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत.

आजतकच्या वृत्तानार, खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी हवालदिल होण्याची गरज नाही. सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपण दिलेली माहिती योग्य आहे की नाही याची तपासणी करा. यामध्ये आपल्या आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर तपासा. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर, pmkisan.gov.in जावे लागेल. होम पेजवर उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ सेक्शनवर क्लिक करा. यामध्ये ‘Beneficiary Status’ हा पर्याय निवडा. त्यानंतर पीएम किसान खाते क्रमांक अथवा आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर हा पर्याय स्वीकारा. डिटेल्स भरल्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल. पीएम किसानच्या अधिक माहितीसाठी pmkisan-ict@gov.in वर संपर्क करू शकता. योजनेच्या हेल्पलाइनवरूनही तुम्हाला मदत मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here