१०० शेतकरी ड्रोनना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना मदतीच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध शहरे तसेच विभागांतील शेतांमध्ये किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी १०० शेतकरी ड्रोनना हिरवा झेंडा दाखवला. हा २१ व्या शतकातील आधुनिक कृषी सुविधांना दिशा देणारा एक नवा अध्याय आहे असे पंतप्रधान म्हणाले. ही सुरुवात ड्रोन क्षेत्राच्या विकासातील महत्वाचे पाऊल असेल. तसेच यातून अनेक नव्या शक्यतांना सुरुवात होईल असे त्यांनी सांगतिले.

अर्थसंकल्प २०२२-२३ मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कृषी तसेच कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. सीतारमण यांनी सांगितले की, केंद्राचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशभरात शेतकऱ्यांना डिजिटल आणि उच्च तंत्रज्ञान सेवांच्या वितरणासाठी शेतकरी ड्रोन, रसायनमुक्त नैसर्गिक शेती, सार्वजनिक – खासगी भागिदारीला प्रोत्साहन दिले जाईल. नव्या तंत्रज्ञानावर भर देताना त्यांनी सांगितले की, पिकांचे मुल्यांकन, जमिनीच्या अभिलेखांचे डिजिटलायझेशन आणि किटकनाशके तसेच शेतीच्या पोषक तत्त्वांच्या फवारणीसाठी शेतकरी ड्रोनला प्रोत्साहन दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here