न्यूयॉर्क : भारतात भाजपाने कॉर्पोरेट कर दरात कपात करुन एक सुवर्णसंधी निर्माण केली आहे, तसेच व्यवसायात अधिकाधिक वृद्धी होण्याच्या दृष्टीनेही सरकार उपाययोजना राबवणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तसेच जागतिक व्यापार्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले. न्यूयॉर्कमधील ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
जागतिक कंपन्याना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेथे स्केल आहे अशा मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतात या, जर मोठ्या बाजारपेठेत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतात या… जर तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या उद्योगात गुंतवणूक करायची असेल तर भारतात या, असे सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने कॉर्पोरेट दर जवळपास 35 टक्क्यांवरुन 25.17 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता, अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्यामुळे कर आकारणी संदर्भात भरताला बड्या जागतिक अर्थव्यस्थांच्या बरोबरीने आणता येईल.
मोदी म्हणाले, भारतात अधुनिकीकरण वेगाने सुरु आहे. शहरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुकूल पायाभूत सुविधांसह सुसज्ज होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. इथला नागरीकही आता पायाभूत सुविधांसह सुसज्ज आहे. यामुळे जर नागरीकरणावर गुंतवणूक करायची असेल तर भारतात या, असे त्यांनी आवाहन केले.
ते म्हणाले, भारताने संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकीची मागणी कली आहे. व्यवसायात सुलभता यावी यासाठी व्यवसायाशी संबंधित असणारे 50 कायदे रद्द केले आहेत. भारत सरकार व्यवसाय क्षेत्राचा सन्मान करते. संपत्ती निर्माण करण्याला महत्व देते. अद्याप अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात आंम्हाला जागतिक व्यावसायिक समुदायासह भागीदारी करायची आहे. येणार्या 2024-25 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.