भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावादरम्यान वैक्सीन च्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांकडून भारतामध्ये बनवल्या जात असणार्या वैक्सीन च्या तयारीची तपासणी करण्यासाठी उद्या स्वत: प्रधानमंत्री मोदी पुणे, अहमदाबाद आणि हैद्राबाद ला जाणार आहेत.
असे सांगण्यात आले आहे की, पीएम नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 28 नोव्हेंबर ला पुण्यामध्ये सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचा दौरा करणार. याबराबेरच ते हैद्राबादलाही जावू शकतील, जिथे भारत बॉयोटेकचे कार्यालय आहे, जिथे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या साथीने कोवैक्सीन नावाने स्वदेशी कोरोना वैक्सीन तयार केले आहे.
याशिवाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या अहमदाबाद येथेही जावू शकतात. अहमदाबाद मध्ये जायडस कैडिला ची फैसिलिटी आहे. ज्याने झेडवायसीओव्ही-डी नावाने वैक्सीन बनवले आहे, ज्याची दुसरी फेज ट्रायलमध्ये आहे. आपल्या प्रवासा दरम्यान मोदी, तीन वैक्सीन कंपन्यांच्या तयारीबाबत चर्चा करतील आणि वैक्सीन च्या वितरणाचे धोरण बनवतील.