तुमकूर : जवळपास 8 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदी थेट 2000 रूपयांचा पहिला हफ्ता जमा करणार आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांना या आर्थिक वर्षात 2000 रूपयांचा दुसरा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जवळपास 11 हजार कोटी रूपये या शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात येणार आहेत.
कर्नाटकमधील तुमकूरमध्ये आयोजित एका समारंभात पंतप्रधान देशभरातील वर्षाकाठी 2000 रुपयांचे तीन हप्ते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणार आहेत. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आज तुमकूरमध्ये मच्छिमारांनाही शेतकरी क्रेडिट कार्ड देण्यास सुरुवात करणार आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असणारं किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतकऱ्यांनाच देण्यात येत होतं.
कृषि मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, आतापर्यंत देशभरातील जवळपास 7 कोटी 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणारी काही हफ्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा बंगाल वगळता इतर अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना झाला आहे. पंतप्रधान शेतकरी योजना मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली होती. यातंर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपये मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
त्याचबरोबर बंगाल एक असं राज्य आहे. जिथे राज्य सरकारने राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अद्याप केंद्र सरकारकडे पाठविलेली नाही. या योजनेसाठी बंगालचे जवळपास 70 लाख शेतकरी पात्र आहेत. त्यांना प्रतिवर्षी 5600 कोटी रूपये देण्यात येऊ शकतात. या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची एक यादी राज्य सरकारला तयार करून केंद्र सरकारला पाठवणं आवश्यक असतं. पण बंगाल राज्यसरकारकडून अशी कोणतीच यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आलेली नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.