हापुड :ऊसाच्या पीकवर पोक्का बोईंग रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा रोग विशेष करुन ऊसाच्या 0238 प्रजातिमध्ये दिसून येत आहे. रोगाची माहिती समजल्यावर शेतकर्यांची चिंता वाढत आहे. याची माहिती ऊस विभागाच्या अधिकार्यांना दिली आहे. लवकरच ऊस विभागाचे पथक गावामध्ये जावून निरीक्षण करेल आणि शेतकर्यांना रोगापासून वाचण्याचे उपाय सांगतील.
ऊसाच्या लागवडीपासून आतापर्यंत हंगाम अनुकुल होण्यामुळे पीक चांगले होण्याची शक्यता केली जात होती, पण गेल्या दिवसांमध्ये हवामानात सततच्या बदलामुळे पीकावर पोक्का बोईंग रोगाने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे. सर्वे दरम्यान याची तक्रार समोर आली नाही,पण आता शेतकर्यांना शेतावर फिरुन रोगाची माहिती मिळाली. गाव रसूलपूर चे शेतकरी जतिन चौधरी म्हणाले की, त्यांनी 15 एकर जमीनीमध्ये ऊसाच्या 0238 प्रजातिची लागवड केली आहे. ऊस आता रोपाचा आकार घेत आहे. ज्यामध्ये पोक्का बोईंग रोग लागला आहे. गावामध्ये इतर शेतकर्याच्या ऊसाच्या शेतातही रोग वेगाने वाढत आहे. यावर ताबडतोब उपाय शोधला नाही तर पूर्ण पीक नष्ट होईल.
रोगाची लक्षणे :
या रोगामध्ये मध्ये वरची पाने हलकी पिवळी, पांढरी होवू लागतात. काही दिवसांनंतर लाल होवून नष्ट होतात. यामुळे ऊसाची वाढ थांबते. तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद झाल्यामुळे ऊस वाळू लागतो.
उपाय :
लागवड करण्यापूर्वी बावस्टीन वापरुन प्रक्रिया करावी , शेतांमध्ये जैविक हाईड्रो कार्ड लावावे, रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत, कॉपर ऑक्सी क्लोराइड 300 ग्रॅम 150 लीटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी. हैक्सापोनाजोल (कंटॉप) 250 मिली 150 लीटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर 15 दिवसाच्या अंतरात दोन वेळा फवारणी करावी.
जिल्हा ऊस अधिकारी निधी गुप्ता म्हणाले की, ऊसामध्ये पोक्का बोईंग रोगाच्या हल्ल्याची माहिती मिळाली आहे. क्षेत्रामध्ये पथके पाठवून निरीक्षण केले जाईल. रोग आढळून आल्यास शेतकर्यांना याच्या उपायाबाबत माहिती दिली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.