नांगलसोती : ऊस पिकावर पोक्का बोईंगसारख्या रोगामुळे पिक नष्ट होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. पोक्का बोईंग रोग वाढल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नांगलसोती क्षेत्रातील हरचंदपूर, सौफतपूर, मायापूरी, चमरौला, तिसोतरा आदी गावातील ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊसाची वाढ खुंटली आहे. शेतकरी राजू, राजेंद्र सिंह, संजीव कुमार, पुष्पेंद्र सिंह, गौरव यांनी सांगितले की, अनेक वेळा शेतात कीटकनाशकांची फवारणी केली आहे, तरीही पोक्का बोईंगपासून सुटका झालेली नाही.
अमर उजालमध्ये प्रकाशित वृत्तानुसार पोक्का बोईंग रोगामुळे उसाची वाढ कमी झाली आहे. ऊसाची पाने पिवळी आणि पांढरी पडत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऊसाची पाहणी करून पिकाची वाढ रोखल्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी पथक पाठविण्यात आले आहे. पोक्का बोईंगवर किटकनाशकांची फवारणी करावी असा सल्ला दिला आहे.