शेतकरी आंदोलनाबाबत पोलिस अलर्ट

गोरखपूर : शेतकरी आंदोलन आणि लखीमपूर खिरी येथील घटनेनंतर गोरखपूर पोलिस आणि प्रशासनही अॅलर्ट झाले आहे. पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

लखीमपूर खिरीत रविवारी घडलेल्या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये संताप आणि आक्रोश आहे. शेतकऱ्यांनी जिल्हा मुख्यालय तसेच प्रत्येक तहसीलमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हालचालींबाबत पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी सतर्कता बाळगून आहेत.

पोलिसांनी जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांवर नजर ठेवली आहे. शेतकरी नेत्यांना घरातून बाहेर पडता येऊ नये असे प्रयत्न पोलिसांनी चालवले आहेत. त्यामुळे शेतकरी नेत्यांच्या घराभोवती पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here