उसाच्या शेतात विनावेतन राबणाऱ्या तामीळनाडूतील १० मजुरांची पोलिसांकडून सुटका

हसन, तमिलनाडू : पोलिसांनी शनिवारी चन्नारायपटना तालुक्यातील डोड्डागाने येथे उसाच्या शेतात मजुरीविना आणि कोणत्याही सुविधांशिवाय काम करणाऱ्या पाच मुलांसह दहा जणांची सुटका केली. सुटका करण्यात आलेले सर्व मजूर तामीळनाडूतील अंबुर शहराचे रहिवासी आहेत.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शनिवारी सकाळी आठ वाजता चन्नारायणपटना पोलिसांना कायदा सेवा प्राधिकरणाकडून एका उसाच्या शेतात तामीळनाडूतील एक कुटूंब विना वेतन राबत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विजय (३२), मल्लिका (५२), दुर्गा (२६), प्रिया (२०), अम्मू (२८) आणि पाच मुलांची सुटका केली. रामलिंगम, पुष्पा आणि रुक्मिणी यांच्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी मजुरांना तामीळनाडूमधून आणण्यात आले होते. तेव्हापासून मजूर कोणत्याही मजुरीशिवाय काम करत होते. त्यांना राहण्यासाठी मुलभूत सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यांचे आर्थिक शोषण केले जात होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून सोडविण्यात आलेल्या मजुरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हजर केले. त्यांना हसन शहरात सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here