धाराशिव : कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरु आहे. यातील पहिल्या गूळ पावडर पोत्यांचे पूजन करण्यात आले. हातलाई शुगर्सच्या आणि युगांडा सरकारमध्ये झालेल्या निर्यातीच्या करारातून या क्षेत्राला फायदा होणार आहे. या शुगर्स कंपनीमुळे तरुणाईला रोजगार मिळाला असून शेतकऱ्यांच्या उसाला हक्काचा कारखानाही मिळाला आहे. कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन सुखमय करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चेअरमन अभिराम पाटील यांनी यावेळी सांगितले.
युगांडा देशाच्या व्यापार सहकारमंत्री नतबाजी हॅरियट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी. मोहनराव आणि अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल यांच्या हस्ते पूजन झाले होते. हातलाई शुगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी मोळीपूजन झाले होते. आता चेअरमन अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी पहिल्या गुळ पावडर पोत्याचे पूजन केले. शितल गायकवाड, राशिद खान, ऋषिकेश शिंदे, आबा शिरसाट, शोएब खान व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.