सोलापूर : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामामध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख २५ हजार ५२५ व्या साखर पोत्याचे पूजन संचालक स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. संचालक तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
चालू हंगामात ५,९३,३०९ मे. टन उसाचे गाळप करून ५,३२,७०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. सध्याचा कारखान्याचा सरासरी साखर उतारा बी-हेवीसह १०.६१ टक्के आहे. दैनंदिन ८ मे.टन याप्रमाणे उसाचे गाळप होत आहे असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, सुजाता शिंदे, रणजित रणनवरे, पांडूरंग एकतपुरे आदी उपस्थित होते.