Poppys Biotech ची तामिळनाडूमध्ये डिस्टिलरी उभारण्याची योजना

तिरुवन्नमलाई : तिरुपूरस्थित निटवेअर निर्यातदार पॉपीज ग्रुपची Poppys Biotech ने तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील सिपकोट इंडस्ट्रियल पार्क (चेय्यर) येथे २०० klpd इथेनॉल उत्पादन क्षमतेसह डिस्टिलरी उभारण्याची योजना तयार केली आहे.

याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रस्तावित युनिट १६.७९ एकर जागेत उभारले जाणार आहे. या प्रकल्पात पाच मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचाही समावेश आहे. याबाबत देण्यात आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, Poppy’s Biotech ला या प्रकल्पासाठी वैधानिक मंजुरी आणि पर्यावरणीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कंपनीला या प्रकल्पावर सप्टेंबर २०२३ पर्यंत काम सुरू करणे आणि डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here