बांग्लादेश : ऊस शेतीची लोकप्रियता वाढली

मदारीपूर : गेल्या काही वर्षात ऊस शेतीत फायदा झाल्यानंतर बांग्लादेशातील मदारीपूर जिल्ह्यात शेतकर्‍यांमध्ये ऊस शेतीची लोकप्रियता वाढली आहे. गेल्या वर्षी याठिकाणी 580 हेक्टर जमीनीवर ऊसाची लागवड करण्यात आली होती.  मदारीपूरमध्ये कृषी विस्तार विभागाने सांगितले की, जिल्ह्यातील चार प्रमुख शहरांमध्ये उच्च तसेच विविध प्रकारामध्ये 678 हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती करण्यात आली आहे. मदारीपुर (डीएई) येथील डिप्टी डायरेक्टर जीएमए गफूर म्हणाले की, मदारीपूरात ऊसाच्या शेतीमध्ये वाढ होत आहे. इथले हवानाम आणि मातीचा पोत ऊसाच्या विविध प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आहे.

शेतकरी ऊसाचे उत्पादन वाढवण्यास उत्सुक आहेत. कारण भात आणि जूट पेक्षाही ऊस पीकात लाभ अधिक आहे.  गफूर म्हणाले की, आंम्ही शेतकर्‍यांना ऊस लागवडीसाठी प्रेरीत करत आहोत. मदारीपूर येथील लोक म्हणाले, पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती अगदी वेगळी होती. पहिल्यांदा दुसर्‍या जिल्ह्यातून ऊस आणावा लागत होता आणि मदारीपूरातल्या बाजारात तो विकला जात होता. पण आता, जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऊसाची शेती केली जात आहे. इथला ऊस स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशाच्या दूसर्‍या भागातही विकला जात आहे.  ऊस शेतकरी नाशू बेपारी म्हणाला, दुसर्‍या शेतकर्‍यांना होणारा फायदा पाहून आंम्ही देखील ऊस शेती करण्यासाठी प्रेरीत झालो. या लोकांनी भात आणि जूट च्या तुलनेत ऊसातून चांगला नफा मिळवला. मी देखील माझ्या जमिनीवर काही भागात ऊस लावला आहे, आणि चांगला नफा कमावला आहे. ते म्हणाले, भात कापणीनंतर लगेेचच दुसर्‍या जमिनीवर ऊसाची शेती करणार आहोत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here