बिजनौर, उत्तर प्रदेश: वनविभागाने जिल्ह्यातील शेतकर्यांना अलर्ट केले आहे. ऊसावर हत्तींचा हल्ला होण्याची शक्यता आहे. ऊसाचे शौकिन हत्ती मानवी वस्तीत प्रवेश करतात, ज्यामुळे मनुष्य हत्ती संघर्षाची स्थिती निर्माण होते. पूर्वी यापेक्षाही अधिक प्रमाणात पीकाचे नुकसान झाले आहे, शेतकर्यांवर हल्ला आणि हत्तींचीही हत्या झाली आहे. वनवास्यानी सांगितल्यानुसार, बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद आणि बिजनौर डिवीजन मध्ये 205 हून अधिक हत्ती आहेत, यापैकी 100 पेक्षा अधिक अमनगढ टाइगर रिजर्व मद्ये आहेत, जे कृषी क्षेत्रापासून वेगळे आहेत.
वन विभागाने हत्तींना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकावर केवळ जैव कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी सांगितले आहे. बिजनौर च्या प्रभागीय वन अधिकारी एम.सेमरन यांनी सांगितले की, आमचे कर्मचारी सावध आहेत. मनुष्य हत्ती संघर्ष रोखण्यासाठी शेतकर्यांना जंगलांच्या सीमेपून लगतच्या क्षेत्रांमध्ये एकट्याने शेतावर न जाण्यासाठी जागरुक केले जात आहे. नजीबाबाद चे डीएफओ मनोज कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आम्ही ग्रामीण लोकांसाठी एक जागरुकता कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आम्ही शेतकर्यांना आग्रह केला आहे की, जर त्यानीं क्षेत्रामध्ये हत्ती किंवा चित्ता पाहिला तर ताबडतोब अधिक़ार्यांना याबाबत सूचित करावे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.