सांगली : यावर्षी सांगली जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १५ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ४३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ४८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात साखरेची सरासरी रिकव्हरी ११.२४ टक्के इतकी आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या तासगाव आणि यशवंत हे दोन साखर कारखाने या हंगामापासून पुन्हा सुरू झाले आहेत. हंगाम संपण्यास अद्याप तीन महिन्यांचा कालावधी आहे. यांदरम्यान, उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे यावर्षी साखरेचा हंगाम नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू झाला. सर्व कारखान्यांमध्ये तोडणी मजूरांची कमतरता भासत आहे. एकीकडे कामगारांची कमतरता भासत असताना दुसरीकडे कामगार उसाची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, वेळेवर उसाची तोडणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून तोडणीसाठी जादा पैसे दिले जात आहेत.