नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील साखरेच्या किमती १९ सेंटने वाढल्या आहेत. हे दर पुढेही तेजीत राहतील अशी शक्यता आहे असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले. जागतिक साखर उत्पादनात घट झाल्याने साखर क्षेत्रावरील फोकस वाढला आहे. ब्राझीलमधील उत्पादनात घट हे त्याचे कारण आहे. ब्राझील ९० वर्षांत सर्वाधिक दुष्काळाने ग्रासला आहे. यासोबतच माल वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. अलिकडेच पसरलेल्या थंडीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वर्मा यांनी सांगितले की, भारत ६ ते ७ मिलियन टन साखर निर्यात करण्यास सक्षम आहे. ते म्हणाले, गेल्यावर्षी आपण सरासरी ६ मिलियन टन साखरेची निर्यात केली होती. हा आजवरचा एक उच्चांक होता. यावर्षी ६.८ ते ७ मिलियन टनाच्या आसपास निर्यात होईल अशी शक्यता आहे. ही एक उच्चांकी निर्यात असेल.
सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत वर्मा यांनी सांगितले की, जागतिक बाजारात साखरेच्या कमतरतेमुळे दरात वाढटी शक्यता आहे. आणि तसेच घडत आहे. साधारणतः १२-१३ महिन्यांआधी कच्च्या साखरेचे दर १२-१२ सेंटच्या आसपास होते. आता ते १८.५-१९ सेंटपर्यंत आहेत. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार साखर उत्पादनात ५ मिलियन टनाची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यात दर २० ते २०.५ सेंटपर्यंत जातील. पुढील दहा ते बारा महिन्यांत साखरेच्या दरात तेजीची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link