नवी दिल्ली : आगामी काळात साखरेच्या किमती स्थिर राहतील आणि किमान आधारभूत किमतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नाही, असे मत, एलारा सिक्युरिटीजमधील संस्थात्मक इक्विटी रिसर्चचे उपाध्यक्ष आणि कृषी निविष्ठा, साखर आणि हॉटेल्स सेक्टरचे लीड प्रशांत बियाणी यांनी व्यक्त केले. किमान पुढील तीन ते चार महिन्यांपर्यंत ‘एमएसपी’मध्ये कोणतीही वाढ होणार नाही आणि ती उद्योगाच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल.नजीकच्या काळात साखरेवर दबाव असेल, पण एमएसपीची संभाव्य वाढ भाव कमीच राहिल, असा अंदाज बियाणी यांनी व्यक्त केला.
बियाणी यांच्या अनुमानानुसार, चालू हंगामाच्या उर्वरित काळात इथेनॉलची बहुतांश मागणी सी-हेवी इथेनॉल आणि ग्रेन इथेनॉलवर केंद्रित असेल, ज्यासाठी सरकारने आधीच किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे या हंगामात भावात आणखी वाढ अपेक्षित नाही. पुढील हंगामासाठी, सरकार आपल्या वार्षिक सुधारणांच्या रुपात किमती निश्चित करेल. साखर क्षेत्रात बलरामपूर शुगर मिल्सला एलाराची सर्वोच्च पसंती आहे. बलरामपूर शुगर मिल्सच्या ऊस उत्पादन वाढवणे आणि उसाची गुणवत्ता, उत्पादन सुधारण्याच्या प्रयत्नांचे बियाणी यांनी कौतुक केले.