भठिंडा : संयुक्त किसान मोर्चाचा भाग अलेल्या पंजाबमधील १६ शेतकरी संघटनांनी २ मे रोजी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जल संसाधन विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अनियमीत वीज पुरवठा आणि धरणांत पाणी कमी असल्याच्या मुद्द्याबाबत ९ मे रोजी आपच्या आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनांनी मार्च महिन्यात ट्रॅक्टर आणि बाईक घेऊन आंदोलन करण्याची तयारी चालवली होती.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, विजेच्या पुरवठ्यातील तुटवडा आणि पाण्याची कमी उपलब्धता यामुळे शेतकरी, खास रुन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी संघटनांनी गव्हाच्या कमी उत्पादनामुळे १०,००० रुपये प्रती एकर नुकसान भरपाई आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ९०० कोटी रुपयांची थकबाकी त्वरीत देण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी शेती क्षेत्राला आठ तास वीज देण्याची मागणी केली आहे.