पुणे : इथेनॉल उत्पादनातील प्रमुख तंत्रज्ञान भागीदार प्राज इंडस्ट्रीजने FY24 मध्ये भारतात 68 प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 15 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कोरले आहे. कंपनीने म्हटले आहे कि, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की FY24 मध्ये प्राज इंडस्ट्रीजने भारतात 68 प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 15 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. प्रत्येक प्रकल्प नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करतो. आम्ही आमचे ग्राहक, व्यावसायिक भागीदार आणि संपूर्ण टीम प्राजचे FY24 मध्ये लक्षणीय यश मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदान देण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
प्राज इंडस्ट्रीज इथेनॉल उत्पादनासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपायांमध्ये नेतृत्व करत आहे, शाश्वत पद्धतींवर भर देत आहे आणि जगभरातील त्याच्या ऑपरेशन्समध्ये ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आहे. अलीकडेच, कंपनीच्या 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि पूर्ण वर्षातील आर्थिक निकालांच्या कामगिरीवर भाष्य करताना प्राज इंडस्ट्रीजचे सीईओ आणि एमडी शिशिर जोशीपुरा म्हणाले होते कि, आमचे त्रैमासिक आणि वार्षिक निकाल आमच्या पोर्टफोलिओच्या विविध आयामांमध्ये व्यवसाय विकास दर्शवतात. आम्ही CBG, SAF आणि ETCA च्या उदयोन्मुख विभागांवर अतिरिक्त लक्ष केंद्रित करीत आहे. ते म्हणाले, गेल्या चार दशकांमध्ये ‘प्राज’ने पर्यावरण, ऊर्जा आणि कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही सर्व सहा खंडांमधील 100 पेक्षा जास्त देशांमधील 1000 पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत आहोत.