आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 साठी पूर्व-अर्थसंकल्प सल्लामसलत बैठका संपन्न

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 साठी पूर्व-अर्थसंकल्प सल्लामसलत बैठका, ज्या 19 जून 2024 रोजी वित्त मंत्रालयात सुरू झाल्या आणि 5 जुलै 2024 रोजी शेवटची बैठक केंद्रीय अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 25 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे अर्थसंकल्प 2024-25 साठी व्यापार आणि सेवांच्या प्रतिनिधींसोबत 7 वी अर्थसंकल्प पूर्व सल्लामसलत बैठक केली.

या बैठकीत 10 भागधारक गटांमधील 120 हून अधिक निमंत्रितांनी भाग घेतला. यामध्ये शेतकरी संघटना आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्ये,एमएसएमई, व्यापार आणि सेवा,उद्योग,अर्थशास्त्र,वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिनिधींचा समावेश होता.

संबंधित बैठकींमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव आणि सचिव खर्च डॉ. टी.व्ही. सोमनाथन, अजय सेठ, सचिव, आर्थिक व्यवहार विभाग, DIPAM चे सचिव तुहिन के. पांडे, विवेक जोशी, सचिव, वित्तीय सेवा विभाग, संजय मल्होत्रा, सचिव, महसूल विभाग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज गोविल, मंत्रालयांचे सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन आणि वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here