केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 च्या पार्श्वभूमीवर 19 जून 2024 पासून केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ मंत्रालयात सुरू झालेल्या अर्थसंकल्पपूर्व विचारविमर्शांचा 5 जुलै 2024 रोजी समारोप झाला.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 25 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 साठी व्यापार आणि सेवांच्या प्रतिनिधींसोबत सातव्या अर्थसंकल्पपूर्व विचारविमर्श बैठकांचे अध्यक्षपद भूषवले.
वैयक्तिक स्तरावर विचारविमर्श करताना, संबंधित 10 गटांमधील 120 हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग; व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि शहरी क्षेत्रांचे प्रतिनिधी या बैठकांमध्ये सहभागी झाले होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ आणि व्यय सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, DIPAM अर्थात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता सचिव तुहिन के. पांडे, आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी, महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज गोविल, संबंधित मंत्रालयांचे सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंथा नागेश्वरन आणि अर्थ मंत्रालय आणि संबंधित मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीही संबंधित बैठकांसाठी उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मौल्यवान सूचना सामायिक केल्याबद्दल सहभागींचे आभार मानले तसेच तज्ञ आणि प्रतिनिधींना आश्वासन दिले की केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 तयार करताना त्यांच्या सूचनांचे काळजीपूर्वक परीक्षण आणि विचार केला जाईल.
(Source: PIB)