बागपत : थकीत ऊस बिले न देणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. याबाबत अप्पर ऊस आयुक्तांनी सोमवारी सर्व जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निर्देश दिले. अप्पर ऊस आयुक्त राजेश मिश्रा यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ क्रॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत त्यांनी सूचना केली. शेतकऱ्यांना वेळेवर तोडणी पावती जारी केली जावी आणि गाळप नियमीत व्हावे यासाठी त्यांनी निर्देश दिले. ऊस बिले देण्यासाठी कारखान्यांवर दबाव वाढवावा असे ते म्हणाले. थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाईची सूचना करण्यात आली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जे कारखाने वेळेवर बिले देणार नाहीत, त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्याची सूचना करण्यात आली. त्यांनी जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांना कारखान्यांची मनमानी सहन न करता कारवाई करण्यास सांगितले. पाच कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. तर नऊ कारखान्यांकडे ५४० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. बागपतमधील तीन कारखान्यांशिवाय मुजफ्फरनगर, मेरठ, गाजियाबाद आणि हापुड जिल्ह्यातील १२ कारखान्यांना येथून ऊस पुरवठा केला जातो. यापैकी बागपत, दौराला, नंगलामल, तिवाती आणि खतौली कारखान्यांनी शंभर टक्के बिले दिली असल्याचे सांगण्यात आले. तर मलकपूर, रमाला, ब्रजनाथ, किनौनी, भैसाना, ऊन आणि मोदीनगर या कारखान्यांकडे ऊस बिले थकीत आहेत.