सहारनपूर : किसान सहकारी साखर कारखाना ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकतो अशी माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ललीत कुमार यांनी दिली.
यंदाचा गळीत हंगाम २०२१-२२ यासाठी कारखान्यामध्ये गाळपासंदर्भातील सर्व तयारी गतीने सुरू आहे, अशी माहिती मुख्य व्यवस्थापक ललीत कुमार यांनी दिली. ते म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार, तारीख निश्चित करून साखर कारखान्याचे गाळप सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गळीत हंगामाबाबतची सर्व कामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊ शकतील अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे त्यानंतरच्या आठवड्यात ऊसाचे गाळप सुरू होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे सिव्हिल इंजिनीअर अनिल शर्मा, चीफ केमिस्ट एस. के. सोळंकी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.