बिजनौर : यंदाचा गाळप हंगाम पूर्ण होताच पुढील गाळप हंगामासाठी ऊसाची उपलब्धता तपासण्याचे काम सुरू होणार आहे. हंगाम संपताच साखर कारखान्यातर्फे पुढील हंगामासाठीच्या उसाचे सर्वेक्षण सुरू होईल. त्या आधारावर गाळप सत्र निश्चित केले जाईल.
गेल्यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी भाजीपाला अथवा फळशेती बंद करून फक्त ऊसावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे गेल्यावर्षी उसाची लागवड ११.५ टक्क्यांनी वाढली. गेल्यावर्षी भरपूर ऊस उपलब्ध असल्याने हंगाम जून महिन्यापर्यंत चालला होता. साखर कारखानदारांनी आपले शेड्यूल तयार केले होते. गेल्या वर्षी सात कारखान्यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस गाळप सुरू केले. यंदाही ऊसाची लागवड अधिक झाली असेल अशी शक्यता आहे.
गेल्यावर्षी दोन लाख ४७ हजार हेक्टरवर ऊस लावण्यात आला. सर्व्हेच्या आधारे कारखाने जर लवकर सुरू केले नाहीत, तर ऊस तोडणीवर दबाव येऊ शकतो. मे महिन्यापासूनच उसाच्या लावणीचा सर्व्हे केला जाणार आहे. कोणत्या कारखान्याच्या क्षेत्रात किती ऊस आहे हे यातून समजू शकेल. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, मे महिन्यात सर्व्हे सुर केला जाईल. त्या आधारे पुढील हंगामाचे नियोजन केले जाणार आहे.