रुडकी, उत्तराखंड: यावेळी जिल्ह्यामध्ये साखर कारखाने गाळप हंगाम लवकर सुरुवात करतील. मान्सूनची तिव्रता आता कमी होण्या बरोबरच कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम जोरात सुरु आहे. साखर कारखान्यांमध्ये केन यार्ड तयार केले जात आहेत. याशिवाय शेतकर्यांनीही खरेदी केंद्रांबाबत प्रस्ताव दिले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्राचे वाटप होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यामध्ये यावेळी 54 हजार हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती करण्यात आली आहे. 77 हजार शेतकरी असे आहेत जे साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा करतात. शेतकर्यांचा प्रयत्न असतो की, साखर कारखान्यांनी गाळप लवकर लवकर सुरु करावे, म्हणजे ऊस तोडणी करुन गव्हाची लागवड करता येवू शकेल. यावेळी जिल्ह्यामध्ये गुऱ्हाळे, पावर क्रशर यांची संख्या खूपच वाढली आहे. अशामध्ये कमी ऊस मिळण्याची शंका कारखान्यांनी वर्तवली आहे. यासाठी साखर कारखान्यांनी गाळप हंगामाच्या तयारीला आता अंतिम टप्प्यात आणले आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, यार्ड तयार झाले आहेत. बॉयलर पासून ते क्रेन वगैरेची दुरुस्ती केली जात आहे. तर दुसरीकडे इकबालपूर साखर कारखान्याचे प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की, कारखान्यात दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्ती पूर्ण होण्याची आशा आहे. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरु करण्याची तयारी आहे. गेल्या वर्षी लक्सर व लिब्बरहेडी साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये गाळप हंगामाची सुरुवात केली होती. पण इकबालपूर साखर कारखाना जवळपास एक महिन्यानंतर 12 डिसेंबरला सुरु होवू शकला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.