मऊ : ऊस गळीत हंगामाबाबत जिल्हाधिकारी अरुण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाने तथा ऊस विकास विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गाळप वेळेवर सुरू करण्याचे निर्देश दिले. घोसी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. ३० नोव्हेंबरपर्यंत कारखाना सुसज्ज होईल, असे ते म्हणाले. जिल्हा ऊस अधिकारी सुनील सिंह यांनी घोसी साखर कारखान्याने गत हंगामात २० फेब्रुवारीपर्यंत गाळप केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची १०० टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. यंदा कारखाना कार्यक्षेत्रात ४३६ हेक्टरमध्ये ऊस लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस विकास विभागाच्यावतीने सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला. घोसी कारखान्याच्या गळीताबाबत माहिती घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दत्त यादव यांनी आतापर्यंत देखभाल, दुरुस्तीचे ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. १० नोव्हेंबरपूर्वी आवश्यक सर्व ती मशीनरी बसवली जाईल. त्यानंतर पुढील वीस दिवसांत उर्वरीत कामे पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले.