डेहराडून : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे उपचारांसाठी झगडणाऱ्या रुग्ण आणि हॉस्पिटल्सच्या मदतीसाठी हरिद्वार जिल्ह्यातील लिब्बरहेडी आणि लक्सर साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. या कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याची तयारी दर्शविली. या कारखान्यांना ऊस विकास तथा साखर उद्योगाचे प्रभारी सचिव चंद्रेश कुमार यांनी पत्र पाठविले आहे. कारखान्यांकडून ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा आराखडा मागविला आहे.
ऊस विकास तथा साखर उद्योग राज्यमंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी यांनी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात होत असलेल्या उशीराबद्दल साखर कारखान्यांना ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करण्याची शक्यता आणि यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
शनिवारी प्रभारी सचिव चंद्रेश कुमार यांनी हरिद्वार जिल्ह्यातील लिब्बरहेडी येथील उत्तम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एल. एम. लांबा आणि लक्सर साखर कारखान्याचे महा संचालक अजय खंडेलवाल यांना पत्र लिहिले होते. ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यास सरकार आर्थिक मदत देईल असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रभारी सचिव चंद्रेश कुमार यांनी साखर कारखान्यात स्थापन केलेल्या इथेनॉल प्लांटमधून औद्योगिक स्तरावर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली आहे. कोरोना महामारीमुळए मानवतेवर मोठे संकट आले आहे. त्याच्याशी लढा देण्यासाठी ऑक्सिजनचे औद्योगिक स्तरावर उत्पादन करून हॉस्पिटल्सना त्याचा पुरवठा करण्याची गरज आहे. कारखाना प्रशासनाने याबाबत गतीने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.