सांगली : डफळापूर (ता. जत) येथील श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर येथे २०२४- २५ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ झाला. श्रीपती शुगरने आगामी गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी सुरू केली आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी यावेळी दिली. हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करण्यास पात्र असलेल्या कंत्राटदारांनी कारखान्यासोबत करार करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्रीपती शुगरकडून याप्रसंगी नऊ तोडणी वाहतूक करणाऱ्यांना कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांच्या हस्ते पत्र देऊन करारबद्ध करण्यात आले. यामध्ये विठ्ठल दुधाळ, सदाशिव हजारे, दत्तू पांढरे, दिगंबर गोपने, जगन्नाथ शेंडगे, शिवाजी माळी, आप्पासाहेब केसकर, महादेव शेजोळे, हनुमंत धोंडीराम पाटोळे आदींचा समावेश होता. कारखान्याचे जनरल कंत्राटदारांना मॅनेजर महेश जोशी उपस्थित होते.