पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ सभेने शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४ रोजी तीन वर्षाकरीता (२०२४-२०२७) अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे, उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार आणि महासचिव म्हणून डॉ. पांडूरंग राऊत यांची सर्वानुमते निवड केल्याची माहिती निवडणूक अधिकारी, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच साखर उद्योगातील तज्ञ मानद सदस्य म्हणून माजी साखर आयुक्त आणि ‘यशदा’चे अतिरीक्त महासंचालक शेखर गायकवाड व श्री रेणूका शुगर्स लि. (नवी दिल्ली) चे कार्यकारी संचालक रवि गुप्ता यांची निवड करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (पुणे) ही महाराष्ट्र राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्था असुन, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी पुणे येथे झाली. या सभेमध्ये ‘विस्मा’चे नविन कार्यकारी मंडळ सदस्य सन २०२४-२७ कालावधीसाठी बहुमताने निवडून आल्याचे अजित चौगुले यानी जाहीर केले.
कार्यकारी मंडळातील सदस्य पुढीलप्रमाणे : १) बी. बी. ठोबरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नॅचरल शुगर जिल्हा यवतमाळ), २) आमदार रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी बारामती अॅग्रो लि. जि. पुणे), ३) डॉ. पाडूरंग राऊत (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. जि. पुणे), ४) खासदार बजरंग सोनवणे, (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्टस् लि. जि.बीड), ५) श्री. महेश देशमुख (अध्यक्ष लोकमगल इंडस्ट्रिज ग्रुप, जि. सोलापूर),६) रणजित मुळे (कार्यकारी संचालक, गगामाई इडस्ट्रिज अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स लि. जि अहमदनगर), ७) यशवर्धन डहाके (अध्यक्ष पराग अॅग्रो फुड्स अॅण्ड अलाईड प्रोडक्टस् प्रा. लि. जि. पुणे), ८) सौ. गौरवी भोसले (अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका, जागृती शुगर अॅण्ड अलाइंड इंडस्ट्रिज लि. जि. लातूर), ९)योगेश पाटील (कार्यकारी संचालक, अथणी शुगर्स लि. जि. सातारा) १०) राहूल घाटगे (कार्यकारी संचालक, श्री गुरुदत्त शुगर्स लि. जि. कोल्हापूर), ११)रोहित नारा (संचालक, सदगुरु श्री श्री साखर कारखाना लि. जि. सागली).