राजारामबापू कारखान्याच्या समृद्ध भूमी अभियानासाठी अध्यक्ष प्रतीक पाटील यांचा पुढाकार

सांगली : वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘संकल्प कृषीक्रांतीचा, मातीच्या सुपीकतेचा’ असा नारा देत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी समृद्ध भूमी अभियान हाती घेतले आहे. २१ फेब्रुवारीपासून ते या अंतर्गत वाळवा तालुक्याचा दौरा सुरू करीत आहेत. यावेळी प्रतीक पाटील हे शेतकऱ्यांशी माती परीक्षण, जमिनीची जैविक सुपीकता सुधारणा, पाचट व पाचटाचे महत्त्व आणि सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली आदीबाबत संवाद साधतील.

बोरगाव येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता बैठक बोलाविली आहे. यावेळी बनेवाडी, मसुचीवाडी, साटपेवाडी, जुनेखेड, नवेखेड येथील शेतकरीही सहभागी होतील. सायंकाळी सहा वाजता साखराळे येथील बैठकीमध्ये खरातवाडी, हुबालवाडी येथील शेतकरी सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी नरसिंहपूर येथील बैठकीत शिरटे येथील शेतकरी तर सायंकाळी तांबवे येथे आयोजित बैठकीत धोत्रेवाडी, येवलेवाडीतील शेतकऱ्यांचा सहभाग असेल. शुक्रवारी नेर्ले आणि कासेगाव येथे बैठका होतील. कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील आणि बँकांचे प्रतिनिधी हेसुद्धा दौऱ्यात सहभागी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here