न्यूयॉर्क : चीनी मंडी
अमेरिकेतील तेल रिफायनरींना असलेला फ्लोरेन्स चक्रीवादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कच्च्या तेलाचे भाव गेल्या चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. मुळात जादा मागणीमुळे किंवा वाहतुकीत येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांमुळे तेलाच्या किमतींना बसणारा दणका हा तात्पुरता असणार आहे. अमेरिकेतील वेस्ट टेक्सासमधील कच्च्या तेलाच्या दरांवर येत्या काही काळात प्रचंड दबाव येणार असून, दर मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता आहे.
मुळात जगातील कच्च्या तेलाचे जागतिक घडामोडींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यातच अमेरिकेने तेल उत्पादनात रशिया आणि सौदी अरेबियाला मागे टाकल्याचा अंदाज दी एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने व्यक्त केला आहे. त्यामुळे अर्थातच अमेरिकेतील घडामोडींवर आता तेल जगताचे लक्ष वेधले आहे. याबाबत ऑइल प्राइज इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे निर्माते टॉम क्लोझा म्हणाले, ‘येत्या सहा ते सात आठवड्यांत कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट पहायला मिळेल. दिवसाला दहा ते पंधरा लाख बॅरल मागणी कमी होईल. अमेरिकेतील रिफायनरिंच्या दुरुस्ती हा कालावधी असतो.’
अमेरिकेत रिफायनरीच्या मागणीला धक्का पोहोचला तर, तातडीने उत्पादन वाढवले जाते. पण, अमेरिकेच्या तेल उत्पादनाला गेल्या काही बसला नाही, तेवढा फटका यंदाच्या हंगामात बसण्याची शक्यता क्लोझा यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘दी इंटरनॅशनल मेरिटाइम आर्गनायझेशनच्या नव्या गाईडलाइन्सच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील रिफायनरींना त्यांच्या मेंटेनन्सची आवश्यक कामे करून घेण्याची हीच चांगली वेळ आहे. जेणेकरून रिफायनरी २०१९च्या उत्तरार्धापर्यंत व्यवस्थित चालतील.’दी इंटरनॅशनल मेरिटाइम आर्गनायझेशनच्या नव्या गाईडलाइन्स जानेवारी २०२०पासून लागू होणार आहेत. यात रिफायनरींना त्यांच्या डिझेल उत्पादनाचा विस्तार करण्यावर मर्यादा टाकण्यात येणार आहेत.
अमेरिकेच्या तेलाची मागणी घटली, तर त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याची भिती आहे. त्याचा तेलाच्या किमतींवर निश्चितच परिणाम होईल. यावर क्लोझा म्हणाले, ‘यावर्षी अगदी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कच्च्या तेलाचे भाव ८० डॉलर पर्यंत राहण्याची शक्यता आहे. इराणवरील अमेरिकेचे निर्बंध आणखी कडक झाले आणि लिबियामधील अंतर्गत परिस्थिती आणखी चिघळली, तर तेलाचे दर ८० डॉलरपेक्षा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.’ ४ नोव्हेंबरपासून इराणमधून होणाऱ्या तेल निर्यातीला रोखण्यासाठी अमेरिका इराणवर आणखी कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
लिबियामधील यादवीमुळे अमेरिकेच्या तेलाला जगात मागणी वाढेल आणि त्याचे दर ८० डॉलरपर्यंत पोहोचतील. त्याचवेळी वेस्ट टेक्सासमधील कच्च्या तेलाचे दर ६५ डॉलरपर्यंत घसरतील, असा अंदाज क्लोझा यांनी व्यक्त केला.