ढाका, बांग्लादेश: इतर देशांप्रमाणे बांग्लादेशा मध्येही उस थकबाकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. साखर कारखाने आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत तर दुसरीकडे उस शेतकरी विरोधी आंदोलनात व्यस्त आहेत. उस शेतकर्यांना 2019-20 मध्ये उस खरेदीसाठी मोधुखली साखर कारखान्याच्या अधिकार्यांशी TK 1.70 करोड ची मागणी करत रविवारी फरीदपुर च्या मोधुखली मध्ये ढाका खुलना राज्य मार्गावर मानवी साखळी करुन विरोध दर्शवला.
बांग्लादेशामर्ध्ंये साखर उद्योग वाईट परिस्थितीतून जात आहे. राज्याच्या स्वामित्ववाले कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली आणि साखर न विकल्याने चिंतेत आहेत. बांग्लादेशामध्ये साखर उत्पादन मूल्य बाजाराच्या भावापेक्षा जवळपास दुप्पट आहे, ज्यामुळे अधिकृत डीलर साखर कारखान्याकडून साखर खरेदी करत नाहीत. आणि कारखान्यामध्ये साखरेच्या स्टॉकमध्ये वाढ होत आहे. साखर कारखाना उस शेतकरी महासंघाचे महासचिव शाहजहां बादशहा यांनी सांगितले की, देशामध्ये कारखान्याकडून उस शेतकर्यांचे TK300 मिलियन पेक्षा अधिक देय आहे. अनियमिततेमुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, पण याचा परिणाम शेतकर्यांना भोगावा लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.