गेल्या महिन्यात प्रमुख मंडयांमध्ये हरभरा, तूर, उडीदच्या किमती ४ टक्क्यांपर्यंत घसरल्या : ग्राहक व्यवहार विभाग सचिव

नवी दिल्ली : ग्राहक व्यवहार विभागाने रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) सोबत डाळी आणि निर्दिष्ट खाद्यपदार्थांच्या किंमतीच्या परिस्थितीवर परवाना आवश्यकता, साठा मर्यादा आणि हालचाली निर्बंध (पहिली आणि दुसरी दुरुस्ती) आदेश, २०२४ च्या काढून टाकण्याबाबत २१.०६.२०२४ आणि ११.०७.२०२४ मध्ये विहित केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या साठा मर्यादेच्या अनुपालनावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती निधी खरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

RAI चे २३०० पेक्षा जास्त सदस्य आणि देशभरात ६,००,००० पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती खरे म्हणाल्या की, गेल्या महिनाभरात प्रमुख मंडयांमध्ये हरभरा, तूर आणि उडीद यांच्या दरात ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली असली तरी किरकोळ विक्रीच्या दरात कोणतीही घसरण झालेली नाही. घाऊक मंडयांच्या किमती आणि किरकोळ किमती यांच्यातील भिन्न ट्रेंडकडे त्यांनी लक्ष वेधले. यातून किरकोळ विक्रेते जास्त नफा कमावत असल्याचे सूचित होत आहे.

दरम्यान, खरीप कडधान्य पेरणीची प्रगती चांगली असल्याची माहितीही त्यांनी दिली. खरीप कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये तूर आणि उडीदचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत, ज्यात नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी कृषी विभाग राज्याच्या कृषी विभागांच्या सतत संपर्कात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सध्याची किंमतीची स्थिती आणि खरिपाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सचिवांनी किरकोळ उद्योगाला डाळींच्या किमती ग्राहकांना परवडतील अशा सरकारच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास सांगितले.

त्यांनी सांगितले की, विहित मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसह सर्व स्टॉकहोल्डिंग संस्थांच्या साठ्याचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. बाजाराशी संबंधित लोकांकडून साठा मर्यादेचे उल्लंघन, अप्रामाणिक साठेबाजी आणि नफेखोरीवर सरकार कठोर कारवाई करेल. किरकोळ उद्योगातील सहभागींनी त्यांच्या मार्जिनमध्ये आवश्यक सुधारणा करतील आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किंमती देण्यासाठी ते दर नाममात्र पातळीवर राखतील असे आश्वासन दिले. या बैठकीत आरएआय, रिलायन्स रिटेल, डी मार्ट, टाटा स्टोअर्स, स्पेन्सर, आरएसपीजी, व्ही मार्ट आदी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here