एचपीसीएलच्या मुंबई आणि विशाखापट्टणम इथल्या तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचपीसीएलच्या मुंबई आणि विशाखापट्टणम इथल्या तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या नागरिकांना परवडणाऱ्या उर्जेची सुनिश्चितता करण्यासाठी एचपीसीएलने आपल्या कर्तव्यापलिकडे जाऊन काम केले आहे असे ट्विट केन्द्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे.

एचपीसीएल मुंबई आणि विशाखापट्टणम तेल शुद्धीकरण प्रकल्प, जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत 113% क्षमतेने 4.96 एमएमटी क्रुड थ्रूपुटसह सर्वाधिक क्षमतेने कार्यरत होते.

केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;

“उर्जा क्षेत्रासाठी चांगली बातमी.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here