नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना नवी भेट दिली आहे. मोदी यांनी पिकांच्या विशेष ३५ प्रकारांचे देशातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रार्पण केले. शेती आणि विज्ञान यांची सांगड घालणे २१ व्या शतकातील भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पिकांच्या प्रजातींचे लाँचिंग केले. कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी रायपूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस टॉलरन्सचा नवनिर्मित परिसर राष्ट्राला अर्पण केला.
यावेळी पंतप्रधानांनी कृषी विद्यापीठांच्या ग्रीन कॅम्पस अॅवार्डचे वितरण केले. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. हवामान बदल आणि कुपोषण अशा दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) ही वैशिष्ट्यपूर्ण अशी पिके विकसित करण्यात आली आहेत. हवामान बदल आणि उच्च पोषक तत्त्वांच्या सामग्रीसह विशेष गुणवैशिष्ट्यांची पिके २०२१ मध्ये विकसित करण्यात आली आहेत. ग्रीन कॅम्पस अॅवार्डची सुरुवात राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठांसाठी प्रोत्साहनपर देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ भारत मिशन, वेस्ट टू वेल्थ मिशनमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता निर्माण व्हावी असा यामागील हेतू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link