प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 डिसेंंबरला उद्योग संघटना फिक्की च्या 93 व्या वार्षिक बैठकीत संवाद साधणार. यावेळी ते प्रेरित भारत बनवण्यामध्ये उद्योग जगताच्या भूमिकेवर आपले विचार मांडणार आहेत. फिक्की ने बुधवारी सांगितले की, प्रधानमंत्री वार्षिक सर्वसाधारण बैठीचे उद्घाटन करतील. डिजिटल माध्यमातून ते बैठक़ीला संबोधित करतील.
संघटनेने सांगितले की, या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शाह, वित्त मंत्री निर्मला सितारमण, रस्ते परिवहन राजमार्ग तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी, वाणिज्य तसेच उद्योग व रेल्वे मंत्री पीयूष गोयल, विदेश मंत्री एस जयशंकर आणि इलेक्ट्रॉनिक्स, आईटी संचार आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद सहभागी होण्याची शक्यता आहे.
फिक्की च्या यावर्षीच्या बैठकीतील वक्त्यांच्या सूचीमध्ये सत्या नडेला (मुख्य कार्यकारी अधिकारी, माइक्रोसॉफ्ट), एरिक श्मिट (नॅशनल सिक्युरिटी कमिशन ऑन एआई चे चेअरमन तसेच अल्फाबेट चे माजी चेअरमन) आणि टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन, कैडिला हेल्थकेयर चे चेअरमन पंकज पटेल तसेच ओयो होटल्स होम्स चे संस्थापक रितेश अग्रवाल सह अनेक महत्वाचे भारतीय उद्योजक सहभागी होणार आहेत. ही बैठक 11,12 आणि 14 डिसेंबर ला आयोजित होत आहे. याची थीम प्रेरीत भारत आहे. जगभरातून या कार्यक्रमामध्ये जवळपास 10,000 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे.