सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साखर कारखाने सुरू करून ऊसाला सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त जर दिला आहे. भविष्यात व्यावसायिक शैक्षणिक व अद्ययावत आरोग्य सुविधांसह इतर विकासकामांना गती देण्यासाठी रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले. उपळाई खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून प्रथमच भरलेल्या पाझर तलावातील पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे होते. प्रास्ताविक उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील यांनी केले.
जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे म्हणाले की, विविध जलसिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ८० टक्केच्या आसपास क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आजपर्यंत आम्ही जे बोललो तेच केले आहे. कधीही खोटी आश्वासने व थापा मारल्या नाही. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून सातत्याने शासनाकडून विविध योजनांमधून कोट्यावरील रुपयांचा निधी आणून विकासकामे केली आहेत. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे, झुंजार भांगे, शिवाजी गोरे, बाबा चव्हाण, सज्जनराव जाधव, प्रदिप चौगुले, आप्पाराव वाघमोडे, भागवत चौगुले, कुमार शिंदे, शरद नागटिळक, विनायक चौगुले, अंकुश लटके, मनोहर गायकवाड, लक्ष्मण जाधव, शाहू वाकडे, बाळासाहेब इंगळे, मदन आलदर, डॉ. चंद्रकांत व्हनमाने आदी उपस्थित होते.