रुडकी : हरिद्वार जिल्हा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास आण्ही प्राधान्य देऊ असे ऊस आणि साखर उद्योगाचे राज्यमंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी सांगितले. इकबालपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
स्वामी यतीश्वरानंद म्हणाले, साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न मिळण्याची मुख्य अडचण आहे. इकबालपूर साखर कारखान्याने २०१७-१८ आणि २०१८-२९ या हंगामातील सुमारे २०० कोटी रुपये थकबाकी आहे. कुंभमेळा झाल्यानंतर याबाबत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल.
भाजपचे मंडल अध्यक्ष चंदन त्यागी म्हणाले, इकबालपूर साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे वेतन दिलेले नाही. यावर मंत्री यतीश्वरानंद यांनी कारखाना प्रशासनाला त्वरीत पैसे देण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले. भाजप कार्यकर्त्यांचे काम प्राधान्याने केले जाईल असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनीही असेच आदेश दिले आहेत असे मंत्री म्हणाले.
दरम्यान बेहडेकी सैदाबाद, खजूरी, मानकपूर आदमपूर, बिंडूखड़क आणि मोलना येथेही ऊस मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष जयपाल सिंह चौहान, राजकुमार खटाना, प्रवीण कुमार, सतपाल, राजेश कुमार, अमन त्यागी, संदीप खटाना, डॉ. रामपाल सिंह, शिवकुमार, मनीष, राजू, संजय, धर्मपाल सिंह, विजय, भूप सिंह आदी उपस्थित होते.