ऊस थकबाकीप्रश्नी प्रियंका गांधींचे उत्तर प्रदेश सरकारवर टिकास्र

लखनौ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वड्रा यांनी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकवलेल्या पैशांबाबत योगी आदित्यनाथ सरकारवर टिकास्र सोडले. चौदा दिवसांत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देणे हा एक जुमलाच होता अशी टिप्पणी त्यांनी केली.

प्रियंका गांधी-वड्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने चौदा दिवसांत शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपये थकवले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचे हे आश्वासनही पोकळ असल्याचे दिसून आले आहे.

लखीमपूर खीरी येथील एक शेतकरी आलोक मिश्रा यांचे साखर कारखान्याने ६ लाख रुपये थकवले असल्याचा उल्लेखही प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. हे पैसै मिश्रा यांना आजही मिळालेले नाही. आपल्या उपचारांसाठी त्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. राज्यात अनेत ठिकाणी शेतकऱ्यांचे असे हाल सुरू असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here