कौतुकास्पद : ऊसतोडणी कामगाराचे कुटुंब बनले आंबा निर्यातदार !

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस कामगारांचा भाग असलेल्या पालवेवाडी येथील तोडणी कामगार असलेल्या संतोष शेषराव पालवे यांच्या कुटुंबाने आता फळबाग लागवडीकडे लक्ष दिले आहे. मेहनत व सेंद्रिय शेतीच्या जोरावर यंदा त्यांनी १० टन केशर आंबा अमेरिकेत निर्यात केली. गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या मेहनतीला आता यश आले आहे. संतोष पालवे यांनी नोकरीचा राजीनामा देत यात लक्ष दिले आणि आपल्या कष्टोच्या जोरावर आंबा व्यवसायात लक्ष घातले.

दहा वर्षांपूर्वी शेषराव पालवे यांनी साडेआठ एकर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली. गावरान, केशर, हापूस, लंगडा, राजापुरी, वनराज, सदाबहार, आम्रपाली, तोतापुरी अशा विविध आंब्याची सुमारे १३०० झाडे लावली. शेततळे करून पाणी साठवत ठिबक सिंचन केले. पारंपारिक पद्धतीने म्हणजे बारदाना, वृत्तपत्राची रद्दी व गवताच्या सहाय्याने आंबे पिकवले जातात. घरातील सर्व नऊ व्यक्ती या व्यवसायात योगदान देतात. ‘सुजय शिवांश फार्म’ नर्सरी सुरू करून त्यांनी पूरक व्यवसाय निवडला आहे. त्यामुळे पालवे कुटुंबाची धडपड तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. अलिकडे सेंद्रिय शेती व फळांचे महत्त्व सिद्ध झाल्याने बाजारपेठ सहज उपलब्ध झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here