किव्ह (युक्रेन) : चीनी मंडी
युक्रेनमधील साखर हंगामात आतापर्यंत १६ लाख ७० हजार टन शुद्ध प्रक्रियायुक्त साखर तयार करण्यात आली आहे. एकूण १२२.६० लाख टन बिटापासून ही साखर तयार झाल्याची माहिती तेथील साखरेशी संबंधित एका संस्थेने दिली.
युक्रेनमध्ये यंदाच्या हंगामात साधारणपणे १३० लाख ६० हजार टन साखरेच्या बिटाची तोडणी झाली आहे. युक्रेनमध्ये साखरेचा हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होतो. यंदाच्या हंगामात युक्रेनमध्ये साखर उत्पादन २० लाख टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात २१ लाख ४० हजार टन साखर उत्पादन झाले होते. त्यात यंदा थोडी घट होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या बाजारपेठेत साखरेची वार्षिक मागणी १३ लाख टनाच्या आसपास असते.